Posts

Showing posts from April, 2020

आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ...

Image
आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ... आयुष्यभर कष्ट करून सांभाळलीस संसाराची गाडी जपल्यास आम्हा सगळ्यांच्याच आवडी निवडी जरा निवांत बस, एन्जॉय कर आजू बाजूचं जग .. सोड ऑर्डर आम्हाला आणून द्यायला हातात कॉफी चा मग त्या  आयत्या कॉफी चा खुशीने फुरका घे .. आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ... यायचीस ऑफिसातून दिवसभर थकून भागून बॅग पण न ठेवता घ्यायचीस श्वास आम्हाला दोन घास भरवून सोडून स्वतःची दुखणी द्यायचीस आमचेच कोड पुरवून जरा रिलॅक्स कर हक्कानं सांग, द्या पाय चेपून कधी तरी स्पा मधल्या मसाज चा आनंद घे .. आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ... दिलास सर्वस्वी आम्हाला वेळ विसरून स्वतःची हौस निघून यायचीस आमच्या साठी जेव्हा मैत्रिणी करायच्या मौज जरा  बघ तो राहिलेला सिनेमा, ऐक ती मनपसंद गाणी पहा नाटक ते विनोदी, हंस खळखळून येऊ पर्यंत डोळ्यात पाणी जरा जोपास ते छंद, त्या हौशींची मजा घे .. आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ... नेहमीच सजवायचीस मला, सगळे लाड पुरवलेस बनवून मला राणी शंभरदा तुला छळायचे मी अगदी येऊ पर्यंत मनासारखी वेणी सगळी नाटक केलीस सहन, स्वतःचा  विसरून च...