स्वामी घरी आले !

मी तसं म्हणलं तर आस्तिक आहे पण अनुभूती, चमत्कार, दृष्टांत अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. देव म्हणजे माझ्या साठी एक प्रचंड शक्ती चा source आहे आणि त्याच्या वरची माझी श्रद्धा ही मुख्यत्वाने मला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहे आणि त्या शक्ती चा आधार घेऊन जे काही आयुष्यं समोर ठेवेल त्याला हसत सामोरे जायची प्रेरणा मिळते असं मी मानते. त्याच्या नामस्मरणातून शांती मिळवणे आणि त्याच्या भक्तीमधून स्वतःचा मार्ग शोधणे हा माझा प्रयत्न राहिला आहे. माझ्या आई चं आणि काही नातेवाईकांचं वेगळं आहे. ते बऱ्याचदा अनुभूती, साक्षात्कार, स्वप्नात देवाने किंवा गुरूंनी दर्शन देणे किंवा काही प्रचिती येणे ह्या बाबतीत बोलत असतात. मी आई ला नेहमीच तोडत आले. "आई तुझं काहीही असतं हा, असं काही अनुभूती किंवा दृष्टांत वगैरे नसतं. आपल्या मानण्यावर सगळं असतं" "अगं मना श्रद्धा तेथे प्रचिती.. तुला नाही कळणार.. " आमचं हे असं discussion बऱ्याचदा झालंय आणि नेहमीच मी असे विषय उडवून लावायचे. आईमुळे आणि बाबांमुळे श्री शिर्डी साईबाबा, श्री गजानन महाराज ह्यांचं घरात खूप केलं जातं. पूजा, ग्रंथपाठ वगैरे बाकी देवांबरोबर ...