Posts

Showing posts from August, 2019

Remember ! All that matters is - Your Mental Health ..

Image
Life has changed me drastically year over the years as phases of my life changed from the childhood to the adulthood and now moving towards the remaining. It has evolved in terms of my existence with the rest of the Society from dependence on the family, relatives and friends and a drive to pursue this happiness among those surrounding me to finding that inner peace and giving utmost priority to self mental health. “A happy you creates happiness around you” - we have been hearing this through various sources of monks, psychology, thoughts for the day quotes and what not.  What does that mean for me really? That means -   caring less about my impression on the others,  feeling less scared of society judging me,  not trying harder to please everyone,  not trying harder to fit others in my equation and forcing my expectations on them,  not trying harder to make or break connections, not trying harder t...

माझी Tattoo जर्नी (My Tattoo Journey)

Image
"मैं सोच रही हूं tattoo करवा लू " Saturday मॉर्निंग चहा चा घोट घेत मी अतीशय उत्साहाने नवऱ्याला सांगितलं. चेहऱ्यावर "आज कुछ तूफानी करते है" चा जोष, डोळ्यांत चमक आणि आवाजात दृढ निश्चयाचे वजन. अपेक्षेप्रमाणे अत्तिशय शांत आणि neutral अशी त्याची प्रतिक्रिया आली. "hmm .. ये कैसे अचानक सोचा?" "अचानक नही है .. बोहोत पेहले से था दिमाग मैं. अभी time है तो सोचा try करू" थोडा pause घेत तो - "Ok.. थोडा research करते है पेहले .. फिर देख लेना" "actually कपल टॅटू करा लेते है .. what say " "देखते है" जेव्हा त्याला एकदम मला तोडायचं नसतं तेव्हा अत्तिशय carefully असा response येतो.. neither positive nor negative .. पण माझ्या साठी नुसतं ते पण पुरेसं होतं "हां चलेगा" मी उत्साहाने म्हणलं आणि लगेच google search ला लागले.. बहुतांश सरळमार्गी लोकांसाठी किंवा आपल्या आधीच्या पीढी साठी tattoo हा शब्द "नसती थेरं" मध्ये ट्रान्सलेट व्हायचा. बऱ्याच वर्षांपूर्वी मी जेव्हा शेज़ारच्या एका मुलीचा tattoo बघ...

ऋणानुबंध

Image
जोशी आज्जी आणि माझी ओळख अगदी अलीकडचीच. दोन अडीच वर्षं झाली असावी.. आम्ही नव्या घरात शिफ्ट झालो आणि काहीच दिवसात क्रिशय च्या आगमनाची चाहूल लागली. डॉक्टरांनी दोघांनाही प्रेग्नन्ट घोषित केलं आणि आमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. आज काल अमेरिकेत म्हणा किंवा इंडिया मध्ये म्हणा डॉक्टर आवर्जून दोघांना pregnant म्हणतात.. ही जाणीव करून द्यायला कि दोघांचीही प्रत्येक phase मध्ये equal जबाबदारी आहे. अगदी बाळ पोटात असल्यापासूनच. नवरा प्रेग्नन्ट आहे असं म्हणलं की हसू येतं पण ती रिऍलिटी नाही का.. त्याला हि तेवढाच प्रवास पार करायचा असतो बायको च्या सोबतीने! असो.. तर आमच्या अनियमित आयुष्याला नियमबद्ध करायची वेळ आली आणि आम्ही काही नियम आखून घेतले. त्यातला एक म्हणजे ऑफिस वरून आल्यावर फ्रेश होऊन walk ला जायचं. लगेचच दुसऱ्या दिवसापासून चालू केलं. जसे जसे दिवस जाऊ लागले तसे काही ठराविक चेहरे नियमित पणे दिसायला लागले आणि नव्या ओळखी वाढू लागल्या. एखादा महिना झाला असावा आणि त्या चेहऱ्यांमध्ये एका चेहऱ्याची भर पडली. ती म्हणजे जोशी आज्जी. आज काल आज्ज्यांच्या व्यक्तिमत्वाची image बदलली आहे. आज्ज्...

The Theory Of Relativity

Image
Friday Evening च महत्व सगळ्यांत जास्तं कुणाला कळत असेल तर ते म्हणजे आमच्या सारख्या software engineer ला.  दुपारच्या रणरणत्या उन्हा मध्ये एखाद्या रखरखीत वाळवंटात तहानेने व्याकुळ जीवाला पाण्याचा तलाव दिसावा तशी असते हि फ्रायडे इव्हनिंग. आठवडाभर खडखड चालणाऱ्या हाताच्या दहा बोटाना, deadline चा तणाव सहन करणाऱ्या मनाला, मेंदूला  आणि छोट्याश्या screen मध्ये खुपसून बसलेल्या डोळ्यांना आराम देणारी अशी ती संध्याकाळ ! अशाच एका फ्रायडे ला काम संपवून मी लगबगीने office मधून निघाले.  आज माझा "me time" होता .. माझ्या friends सोबत .. फक्त माझा असा "me time". हि me time ची भानगड काय आहे ते आज कालच्या मॉडर्न mommies ना चांगलाच माहित आहे. २४/७ एक आई/वडील होऊन राहणं हि काही सोपी गोष्ट नाही. आपल्या मुलांसोबत आपण आपलं असं अस्तित्व कुठे ना कुठे तरी हरवत असतो. मुलांमध्ये पूर्ण गुंतून जाताना स्वतःला पूर्ण विसरू नये यासाठी कधी कधी गरजेचा असणारा असा हा me time. मनीष आणि मी दोघेही घेतो. कधी मी तर कधी तो. आणि ४/५ तासांकरता का होईना स्वतःला जगतो. कधी वाचन करून .. कधी friends ना भेटून त...