माझी Tattoo जर्नी (My Tattoo Journey)



"मैं सोच रही हूं tattoo करवा लू "
Saturday मॉर्निंग चहा चा घोट घेत मी अतीशय उत्साहाने नवऱ्याला सांगितलं. चेहऱ्यावर "आज कुछ तूफानी करते है" चा जोष, डोळ्यांत चमक आणि आवाजात दृढ निश्चयाचे वजन. अपेक्षेप्रमाणे अत्तिशय शांत आणि neutral अशी त्याची प्रतिक्रिया आली.
"hmm .. ये कैसे अचानक सोचा?"
"अचानक नही है .. बोहोत पेहले से था दिमाग मैं. अभी time है तो सोचा try करू"
थोडा pause घेत तो - "Ok.. थोडा research करते है पेहले .. फिर देख लेना"
"actually कपल टॅटू करा लेते है .. what say "
"देखते है"
जेव्हा त्याला एकदम मला तोडायचं नसतं तेव्हा अत्तिशय carefully असा response येतो.. neither positive nor negative .. पण माझ्या साठी नुसतं ते पण पुरेसं होतं
"हां चलेगा" मी उत्साहाने म्हणलं आणि लगेच google search ला लागले..
बहुतांश सरळमार्गी लोकांसाठी किंवा आपल्या आधीच्या पीढी साठी tattoo हा शब्द "नसती थेरं" मध्ये ट्रान्सलेट व्हायचा. बऱ्याच वर्षांपूर्वी मी जेव्हा शेज़ारच्या एका मुलीचा tattoo बघून "मला ही वाटतंय करून घ्यावा, छोटासा एखादा" असं म्हणलं तेव्हा major मतप्रदर्शन झालं. असले decisions बिना परवानगी घेण्यासाठी डेरिंग लागायचं.. (आणि पैसे पण)
"कसली थेरं नुसती, फालतू फॅड आहे .. स्वतःला टोचून घ्यायचं, सांगितलंय कुणी.. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा "
"तुमच्या generation मध्ये टॅटू फॅटू कौतुक वाढलंय, त्यात काय नवीन.. आमच्या काळापासून गोंदण असायचं. शास्त्र असायचं त्यामागे, असं उगीच कुठेही काहीही काढायची नाहीत लोकं आणि लहानपणीच करून घ्यायची "
"कशाला हवीत असली नाटकं .. अगदीच ऊत्साह उतू चालला असेल तर तो पाण्याचा लावून घे, bubble gum सोबत यायचा ना तसला, change पण करता येईल नवा दरवेळेस"
"जमणारे का तुला .. साधं भाजी चिरताना बोट कापलं तर बोंबाबोंब होते तुझी, उगीच कशाला स्वतःहून ओढवायची दुखणी "
अशी एकदम प्रेमळ मतफेक झाल्याने जो काही थोडा फार उत्साह होता तो मावळून गेला आणि त्या नंतर tattoo च्या विचाराचा sunset झाला. हा सूर्य उगवला तो बऱ्याच वर्षांनी office मध्ये एका collegue चा लेटेस्ट tattoo बघून .. तसं मध्ये मध्ये विचार यायचा डोक्यात, पण routine च्या राक्षसाला बळी पडलेलं life असं ऑफ ट्रॅक जायची परवानगी द्यायचं नाही आणि अशा कित्येक छोट्या छोट्या इच्छांची आहुती व्हायची. पण ह्यावेळेस मी ठरवलं.. काहीही झालं तरी मी करणारच. Research चा श्री गणेशा झाला आणि सुरुवात किती मोठा टॅटू करावा पासून ते नक्की कसला टॅटू करावा पर्यंत चालू झाली.
ह्या जगात बऱ्याच प्रकारची टॅटू type माणसं असतात. टॅटू बद्दल त्यांचं मत हे थोडं फार माणूस ओळखायला मदत करू शकत असं मला वाटतं.
टॅटू वगैरे च्या फंदात न पडणारी .. जे देवाने दिलंय शरीर ते तसंच छान आहे .. उगीच कशाला काही करायचं !
ही लोकं mostly routine प्रेफर करतात. त्यापेक्षा वेगळं काही बाहेर जाऊन डेरिंग वगैरे कशाला करा.. एवढा वेळ आहे कुणाकडे. टॅटू हा कन्सेप्ट त्यांना पटत नाही किंवा आवडत नाही. टॅटू, वेगवेगळ्या ठिकाणी टोचणे, केस लाल निळे रंगवणे हे प्रकार ह्या लोकांसाठी हिप्पी असतात. मी ही आयुष्यातील बरीच वर्षे ह्यात मोडायचे.
मग येते - टॅटू करायचा तर आहे, पण केला नाहीये अजून - कॅटेगरी
काही वर्षांपूर्वीच माझं ह्या कॅटेगरी मध्ये प्रोमोशन झालं. confused .. दहा लोकांना विचारणार काहीही निर्णय घेण्या आधी.. खूप खोल विचार करणार .. analyse वगैरे करणार आणि ह्या सगळ्यात बरीच वर्ष गेली की मग काय निर्णय घेणार
next is - छोटासा टॅटू करणारी .. निरखून पाहिल्याशिवाय कुणाला दिसणार पण नाही असा
हे म्हणजे करू की नको .. करू की नको .. चला करूनच घेऊ असं. म्हणजे टॅटू पण केला आणि दुनियेला दाखवायची गरज नाही .. माझं पण खरं तुझं पण खरं. मी शक्यतो ह्या कॅटेगरी मध्ये यायचं पहात होते
ह्यापुढची कॅटेगरी म्हणजे - आई, वडील , प्रेमी , मुलं.. कुणाला तरी डेडिकेटेड अशी मध्यम टॅटू करणारी
हे लोकं समर्पीत असतात .. कुणालातरी कशालातरी .. पूर्ण समर्पण. मग त्यात "daddys little girl" प्रियांका चोप्रा येते किंवा "RK" dedicated .. नो repent .. दीपिका पदुकोण येते .. सैफिना वगैरे वगैरे. ह्याला अत्तिशय दृढ समर्पण लागतं .. permenant टॅटू असतो राव .. असा उगीच कुणाला पण नाही dedicate करता येत
and finally पूर्ण शरीरभर टॅटू असणारी ..
हे लोकं म्हणजे टॅटू चे born ambassador.. माझं शरीर हे टॅटू साठीच बनलं आहे .. मी जन्मतःच असं येणार होतो/होते पण वरचा विसरला .. म्हणून आता मला माझ्या जन्माचं उद्दिष्टं पूर्ण करायचं आहे .. ह्यात बरेच बॉडी वाले लोकं येतात किंवा often टॅटू सोबत केस वगैरे लाल दिसतात.. नाक , कानाच्या बऱ्याच जागा, कधी कधी ओठ जीभ वगैरे टोचलेले दिसतात .. म्हणजे असं नॉर्मल शरीर unacceptable आहे आम्हाला.. ठेवलंय काय त्यात वगैरे प्रकारची लोकं यात मोडतात
माझी कॅटेगरी बऱ्यापैकी फिक्स होती .. छोटासा टॅटू. आता पुढचा प्रश्न गहन होता.. नक्की कसला टॅटू करावा? मग मेजर चर्चा चालू झाली .. watsapp वर गंभीर विचारांची देवाण घेवाण चालू झाली .. मी इंडिया timezone , USA timezone असं कधीही messages करू लागले .. झोप वगैरे नॉर्मल लोकांना लागते .. असं टॅटू ने सैराट झालेल्यांचं चालतं कसंही ..
"हार्ट, फुलपाखरू, स्टार वगैरे फारच फुटकळ वाटतं .. नाही का ? "
"काहीही काय अगं .. किती नाजूक आणि गोडं दिसतं ते .. आणि तुला सूट पण होईल. छोटा हवा आहे ना?" - इती वहिनी
"धनुष्य बाण, भाला किंवा तलवार वगैरे काढ" - दादा
"तुम्हारा नाम ही लिख लो" - ह्याचा थोडक्यात गुंडाळायचा प्रयत्नं.. ह्यावरून हे तर स्पष्टच होतं की कपल टॅटू वगैरे ह्या जन्मात होणार नव्हतं.
"मेरा पती बोअर है कर लू क्या?" - माझी रागात प्रतिक्रिया. त्या नंतर इकडून discussion चा पूर्णविराम.
एव्हाना फॅमिली ग्रुप वर असल्यामुळे आई बाबाना पण इंटरेस्ट आला होता.
"अगं आई च पूर्ण आयुष्य हे मुलांना समर्पित असतं .. मी असते तर तुम्हा दोघांच्या नावाने केला असता बाई" .. आई च मत
"तुझ्या त्या ऑफिस च्या मुलीने काय केलंय ?"
"ती chinese आहे .. त्याच भाषेत काही केलंय .. मी नाही विचारला अर्थ"
"ओम .. श्री .. असं काही कर .. किंवा संस्कृत मध्ये काही .. आपली पूर्व भाषा आहे .. classy पण वाटेल " .. बाबा
"मला मोठा नाही करायचा आहॆ .. छोटासा काहीतरी".
त्या नंतर बरेच दिवस बरीच suggestions आली-
"चंद्र .. सूर्य .. तारे "
"देवाची नावं.. त्रिशूळ .. गदा .. वगैरे "
"फुलं पानं .. initials .." एक ना दोन .. हजार options सुचवले गेले .. इमेजेस ची देवाण घेवाण झाली
शेवटी बऱ्याच विचाराअंती मी ठरवलं "मोरपीस".. तसही मी विष्णू / कृष्णाची भक्त आहेच .. मुलाचं नावही त्याच्याशी related आहे आणि नाजूक वाटेल! आकाराला थोडं मोठं पण छोटा size काढायला सांगेन .. फॅमिली ग्रुप वर आयडिया approved झाली आणि मग कुठे आणि कधी असा मुहूर्त बघणे सुरु झाले.
माझ्या ऑफिस च्या मैत्रिणीने reference दिला आणि ओळखीत आहे म्हणून मी लगेच ओके केलं. finally साधारण एक महिन्याच्या दीर्घ चर्चा आणि विचारांची देवाण घेवाण ह्यानंतर मुहूर्त पक्का झाला! माझी मैत्रीण दुसऱ्या हातावर करून घेणार होती आणि माझी आणि तिची अपॉइंटमेंट तिनेच घेतली
"मैं भी चलता हू.. अगर कुछ जरुरत पडी .. तो better रहेगा " - ह्याचं supportive आणि caring proposal आलं
"नही friend रहेगी .. ड्रॉप कर देगी. डोन्ट वरी " असं म्हणून मी निघाले. मिठी वगैरे मारली, लढाईला जायच्या जोषात! मुलाचा किस घेऊन बाय बाय करून गाडीत बसले. स्वारी निघाली. मोरपीस कसं हवं ह्याची image वगैरे search करून मोठ्या कष्टाने फायनल करून घेतली होती.
काही म्हणलं तरी सगळ्यांनाच curiosity होती. "आम्हाला फोटो पाठव ग .. आणि फार दुखत असेल तर काही दिवस सरळ बाहेरून खायचं आणा" असे घरून सल्ले आले
साधारण एखाद दोन तासांनी दारावर बेल वाजली. ह्याने अत्तिशय उत्साहाने दार उघडलं.
"कैसा रहा .. "
मी आत येऊन बसत म्हणलं "थोडा पानी देना". बाहेर पाणी घेऊन आल्यावर त्याच्या लक्षात आलं की ज्या हातावर करायचं ठरलं होतं, तो हात रिकामाच होता ! कुठेही टॅटू काय पण छोटासा ठिंब पण नव्हता!
"क्या हुआ .. कीया नही क्या "
थोडा pause घेत मी - "अरे ..वोह क्या है .. if you do tattoo, you can not donate your blood .. you know!"
"किसने बोला .. और वैसे भी तुमने reecently कभी किया नही है ब्लड donate"
"हां पर कभी जरुरत पडी तो ? किसी को भी जरुरत पड सकती है ना! जाने दो "
त्याच्या एकूणच काय ते लक्षात आलं असावं. चेहऱ्यावरचं हसू दाबत त्याने विषय संपवला. पण त्याला काय माहित की नक्की काय झालं होतं -
एवढी वर्ष टॅटू टॅटू केलं .. पण प्रत्यक्षात कधी पाहिलंच नव्हतं की टॅटू होतो कसा. माझ्या chinese मैत्रिणीचा टॅटू होताना बघून तोंडचं नुसतं पाणीच पळालं नाही तर चक्कं घेरी आली होती मला! तिला बिचारीला स्वतःचा टॅटू सोडून मला पाणी पाजावं लागलं आणि घरी सोडावं लागलं! टॅटू ची सुई आत जाताना बघून माझी पळता भुई थोडी झाली . बाकी काही असो ना असो परतीच्या मार्गावर हा निश्चय नक्की झाला होता - टॅटू वगैरे नसती थेरं आहेत, उगीच कशाला स्वतःला टोचून घ्या? त्यापेक्षा तो आपला पाण्याचा टॅटू बरा !! "अपने बस की बात नही " म्हणत जैसे थे कॅटेगरी मध्ये मी प्रवेश घेतला.
आता फॅमिली ग्रुप वर उत्तरं देणे आणि वर्षानुवर्षे दादाचे टोमणे आणि चिडवणे ऐकायची तयारी करणे एवढं शिल्लक होतं.
तुम्ही काय हसताय .. टॅटू केला असेल तर हसा नाही तर गप्पं बसा !!

Comments

Popular posts from this blog

Remember ! All that matters is - Your Mental Health ..

स्वामी घरी आले !