The Theory Of Relativity





Friday Evening च महत्व सगळ्यांत जास्तं कुणाला कळत असेल तर ते म्हणजे आमच्या सारख्या software engineer ला.  दुपारच्या रणरणत्या उन्हा मध्ये एखाद्या रखरखीत वाळवंटात तहानेने व्याकुळ जीवाला पाण्याचा तलाव दिसावा तशी असते हि फ्रायडे इव्हनिंग. आठवडाभर खडखड चालणाऱ्या हाताच्या दहा बोटाना, deadline चा तणाव सहन करणाऱ्या मनाला, मेंदूला  आणि छोट्याश्या screen मध्ये खुपसून बसलेल्या डोळ्यांना आराम देणारी अशी ती संध्याकाळ !
अशाच एका फ्रायडे ला काम संपवून मी लगबगीने office मधून निघाले.  आज माझा "me time" होता .. माझ्या friends सोबत .. फक्त माझा असा "me time". हि me time ची भानगड काय आहे ते आज कालच्या मॉडर्न mommies ना चांगलाच माहित आहे. २४/७ एक आई/वडील होऊन राहणं हि काही सोपी गोष्ट नाही. आपल्या मुलांसोबत आपण आपलं असं अस्तित्व कुठे ना कुठे तरी हरवत असतो. मुलांमध्ये पूर्ण गुंतून जाताना स्वतःला पूर्ण विसरू नये यासाठी कधी कधी गरजेचा असणारा असा हा me time. मनीष आणि मी दोघेही घेतो. कधी मी तर कधी तो. आणि ४/५ तासांकरता का होईना स्वतःला जगतो. कधी वाचन करून .. कधी friends ना भेटून तर कधी movie पाहून.
आज फ्रेंड्स ना भेटणार म्हणून मी एकदम खूष  होते. ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी मी पोहोचले. प्रीती as usual वेळेच्या आधीच पोहोचली होती तर पूजा ला नेहमीप्रमाणे उशीर झालेला. आम्ही दोघीनी कॉफी ऑर्डर केली आणि पूजा ची वाट पाहता पाहता गप्पा मारू लागलो. इतक्यात पूजा आली. डोळे सुजलेले, चेहरा मलूल आणि अत्तिशय थकून गेलेली. भरपूर रडून आली असावी अस दिसत होत. आम्ही दोघी एकदम उठलो आणि तिच्या जवळ जात म्हणालो
"काय ग.. काय झाल.. सगळं ठीक ना? दिनेश आणि वीर तर ठीक आहेत ना.. काय झाल..  बोल ना पटापट"
हुंदके देत देत ती बसली. आम्हाला अजिबात राहवत नव्हत.
"अगं  बोलशील कि नाही काही.. "
"girls .. please sit .. एवढा काही serious नाही आहे.."  pause घेत पुढे म्हणाली "I lost five thousand bucks.. "
मी आणि प्रीती एव्हाना बसलो होतो. काही जीवघेणं नाही ऐकून आमच्या जीवात जीव आला. आमच्या चेहऱ्या वरील प्रश्ण चिन्हं पाहून पूजा पुढे बोलू लागली.
"अगं मी शेअर मार्केट मध्ये शेअर्स घेते ना.. तुम्हाला तर माहीतच आहे.. माझा अंदाज कधी चुकत नाही.. पण ह्यावेळेस चुकला गं. दिनेश सांगत होता नको घेऊस पण मी हट्टाने घेतले ५००० चे.. आणि डुबली ग ती फर्म.. एवढे कष्टाने कमावलेले पैसे .. एका झटक्यात माझ्या मूर्ख पणामुळे घालवले"
अस म्हणून ती अजूनच उदास झाली.
"अंग असं  होतंच पुढे मागे थोडं.. कधी फायदा कधी नुकसान असं  होणारच ना.. एवढा विचार नको करुस गं.. नेहमीच कसं आपल्या मनासारखं होणार"   .. प्रीती तिला समजावू लागली. माझा आणि शेअर मार्केट चा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. थोड्या वर्षांपूर्वी उत्साह होता पण जेव्हा पहिले २/४ बाण वाया गेले आणि नुकसान झालं.. तेव्हाच मी त्यातुन काढता पाय घेतलेला. त्यामुळे मी तिला काय समजावणार. तरी आपलं मी काहीस समजावू लागले. तेवढ्यात प्रीती चा फोन वाजला म्हणून ती बाहेर गेली.
१०/१५ मिनिटं झाली असावीत.. पूजा ने हि कॉफी घेतली होती आणि जरा okay झाली होती तोवर प्रीती एकदम घाईघाईत आत आली
"पूजा कुठली फर्म म्हणालीस ग तू.. "
"VIPT म्हणून आहे"
"वाटलंच मला .. वाटलंच .. तरी म्हणलं हा दुपार पासून माझा फोन का घेत नाहीये.. आशुतोष ग.. हजारदा सांगितलं त्याला मी .. नको तिथे पैसे घालत जाऊ नकोस.. तरी ऐकलं नाही.. आता १०००० चा नुकसान होऊन बसलय... इतका वैताग आला आहे ना मला.. " असा म्हणून प्रीती तडतडायला लागली..
आता मात्र पूजा चा चेहरा बदलला होता. आधी पेक्षा थोडी तुकतुकी आली होती. आता रोल रिव्हर्स झाले होते. आता पूजा प्रीती ला समजावू लागली
"अगं ठीक आहे.. होणारच ग अस कधी ना कधी.. नेहमीच थोडी सगळं गणित बरोबर सुटतं .. जाऊ देत आज आपला दिवस आहे .. आपण enjoy करू.. तू नको विचार करुस जास्त.."
हा सगळा प्रकार चालू असताना आमच्या watsapp ग्रुप वर अजून बऱ्याच फ्रेंड्स चे मेसेजेस आले.. कुणाच १००० तर कुणाचं २०००० .. काही ना काही नुकसान झालं होत.
ते सगळं बघून मग दोघी जरा स्थिरावल्या. आणि खरंच सांगायचं झालं तर मी मनातल्या मनात स्वतःला शाबासकी देत होते. "बरं झालं आणि शेअर्स चा नाद सोडला" अशी. Anyways आमची इव्हनिंग बऱ्यापैकी एन्जॉय करून आम्ही घरी निघालो आणि माझं विचार चक्रं चालू झालं. हसू पण येत होतं आणि नवल पण वाटतं होतं. किमान ३ तासाच्या आत जे काही मानसीक रंग बदल मी पाहिले ते पाहून human psychology ची वेगळीचं झलक माझ्या समोर आली and I realised that एव्हरीथिंग इन धिस लाईफ इस रिलेटिव्ह.
लहानपणी शाळे मध्ये Einstein नामक शास्त्रज्ञाचा सिद्धांत शिकले होते. "The theory of relativity". आयुष्याच्या physics ची Theory वेगळी आहे. ती पण रेलॅटिव्हिटी चीच थिअरी खरी पण तीची व्याख्या खूप वेगळी. ती व्याख्या अशी कि "human happiness and sorrow is relative to that of human beings around". अर्थ असा कि मानवी आनंद आणि दुःख हि भोवतालच्या मानवांच्या आनंद आणि दुःखांशी सापेक्ष असतात. जगात कुणी दुखी असेल तर तो मुख्यत्वे दुसऱ्याच्या सुखामुळे.
म्हणजे बघा हं.. आपण घर घेतलं तर ते घर आपल्या चार मित्रांच्या कंपॅरिसन मध्ये कसा आहे हे आपण पाहतो.
"अरे यांच्या rooms फारच छोट्या आहेत .. आपल्या कशा जरा सुटसुटीत आहेत.. खेळती हवा पाहिजे कि थोडी .. काय राव"
"आहो बघा ना .. तिच्या गॅलरी मध्ये केवढी जागा आहे .. आपली कशी अगदी मोरी सारखी आहे .. साधी उभं राहायची पण सोय नाही.. कुंड्या ठेवणं दूरच.. बिल्डर ने मेल्याने जागा खाल्लीये.. आपल्या नशीबात हे असलंच सगळं.. " असा म्हणून नशिबाची पण वाट लावतो ..
आता आपल्या कंपॅरिसन मध्ये ना अमिताभ चा बंगला असतो नाहि फूटपाथ वर थाटलेल्या बिचाऱ्या गरीबाच्या झोपड्या. सगळं कसं तर सापेक्ष .. Relative. आपल्या भोवतीच्या आणि बहुतकरून आपल्या ओळखीच्या लोकांचं कसं आहे.. आणि त्या मानाने आपलं किती बरं वाइट आहे हाच विचार शक्यतो साधारण माणूस करतं असतो. 
इंजिनीरिंग चा result आल्यावर एक डाउन असणारा उदास चेहरा सुम्या चे ३ डाउन आहेत म्हणल्यावर खुलतो .. तर मन्या ऑल क्लिअर झाला ऐकून उदास होतो "साला अभ्यास नं करता कसा काय क्लिअर होतो हा .. कळत नाही "
office मध्ये रगडून काम केल्यावर पगार वाढ मिळाली ह्याची ख़ुशी दुसऱ्याला promotion मिळालं ऐकून लगेच मावळते तर तिसरा below average परफॉर्म केल्यामुळे fire झाला ऐकलं कि वाईट वाटून आपलं किती बरं आहे ह्याची जाणीव होते. आपल्या पेक्षा बारीक व्यक्तीला आपण फिट मानतो आणि तिच्या सारखे व्हायचा प्रयत्न करतो तर कुणी तरी आपल्याला फिट मानत असत आणि आपल्या सारखं बारीक व्हायची आशा करतं.अगदी रंग .. रूप..  उंची .. हुद्दा.. पैसा.. घर .. नवरा बायको.. नाती ..  मुलं बाळ .. सगळं सगळंच आपण ह्या सापेक्षवादाच्या तराजू मध्ये तोलतो.

जगा मध्ये बरीच दुःख आहेत.. खूप संकट आणि विकट परीस्थित राहणारी माणसं आहेत .. आणि ह्याचं जगात प्रचंड सुख पदरात पडलेली .. ज्यांना आपण सहज पणे "lucky" म्हणतो अशीही माणसं आहेत. आई लहानपणापासून शिकवायची "मना गाडी मधून फिरणाऱ्याने नेहमी रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाकडे पाहावं आणि आपण किती बरे आहोत ह्याची जाणीव होऊन खूष राहावं."  पण एक गोष्टं जशी मोठी झाले तशी लक्षात येतेय.. कि ख़ुशी साठी किंवा दुःखासाठी कुणा कडे का पाहावं.. काय गरज ह्या सापेक्षवादाची.. आपलं सुखं आणि आपलं दुःख हे पूर्णपणे आपलं असावं नाही?

आज मला यश मिळालं ... मी खूष आहे .. ते यश दुसऱ्या कुणापेक्षा तरी कमी किंवा जास्तं असलं तर त्याने माझी खुषी कमी व्हायला नको नाही का? आज मला दुःख वाटतंय.. माझ्या पेक्षा जगात जास्तं दुःख असणारी कित्येक लोकं आहेत .. जास्तं वाईट परिस्थिती झेलणारी कित्येक माणसं आहेत .. पण माझ दुःख हे माझं नाही का.. ते वाटणारच. त्या दुःखाला कवटाळून न बसता दुसऱ्यांकडून inspiration घेऊन पुढे चालत राहणं महत्वाचं. किंवा आपल्या सुखा मध्ये बुडून राहण्या पेक्षा दुसऱ्याच्या दुःखात त्याला साथ देणं महत्वाचं. पण सापेक्ष वाद नको.

बोलणं सोप्पं आहे हो .. करणं खूपच अवघड. शेवटी माणूस रेलॅटिव्ह बघत असतो आणि बघत राहणार.

काही काही अपवाद असतातच. मनीष म्हणतो ना .. "१०th मे बहुत मार्क्स लाये .. बहुत खूष था .. ऐसा लग रहा था जैसे मेरे  जितना भारी कोई नही .. स्कूल से निकल कर कॉलेज गया तब इतने महान लोग मिले कि उनके सामने मैं कूछ भी नही .. तब हि मैने जिंदगी का सबसे बडा पाठ पढ लिया .. दुनिया मैं तुमसे बेहतर हमेशा कोई ना कोई रहेगा और तुम किसी से बेहतर .. इसलिये तबसे रेलॅटिव्हिटी छुट गई :)" हा इतका साधा सोपा पाठ जर प्रत्येकाने समजून घेतला तर काही ना काही पॉसिटीव्ह बदल नक्कीच येईल नाही का?
तुमचं माहित नाही मला .. मला मात्र हा धडा गिरवायचा आहे .. आता सापेक्षवाद नको .. घ्यायचं तर फक्त इन्स्पिरेशन आणि द्यायचा तर फक्त सपोर्ट )

Comments

Popular posts from this blog

Remember ! All that matters is - Your Mental Health ..

स्वामी घरी आले !

माझी Tattoo जर्नी (My Tattoo Journey)