ज्योत



नैराश्याचा जेव्हा सर्वत्रं .. पसरेल अंध:कार
चिंतेचे मळभ दाटेल .. मन काहूर काहूर
ना दिसेल दिशा ना मार्ग .. गंतव्य ही वाटेल दूर
सोडोनी द्यावे सर्वही .. काळ होईल असा निष्ठूर

पण सोडू नकोस तू धीर .. मानू नकोस तू हार
उठ, साठवून ते बळ.. ना होता अशी लाचार
पेटव ती ज्योत धीराने .. कर तेजोमय चराचर

शोधून ना सापडे कोठे .. बघ दडला तुझ्यातच तो ईश्वर !  

Comments

Popular posts from this blog

Remember ! All that matters is - Your Mental Health ..

स्वामी घरी आले !

माझी Tattoo जर्नी (My Tattoo Journey)