Posts

ज्योत

Image
नैराश्याचा जेव्हा सर्वत्रं .. पसरेल अंध:कार चिंतेचे मळभ दाटेल .. मन काहूर काहूर ना दिसेल दिशा ना मार्ग .. गंतव्य ही वाटेल दूर सोडोनी द्यावे सर्वही .. काळ होईल असा निष्ठूर पण सोडू नकोस तू धीर .. मानू नकोस तू हार उठ, साठवून ते बळ.. ना होता अशी लाचार पेटव ती ज्योत धीराने .. कर तेजोमय चराचर शोधून ना सापडे कोठे .. बघ दडला तुझ्यातच तो ईश्वर !  

स्वामी घरी आले !

Image
मी तसं म्हणलं तर आस्तिक आहे पण अनुभूती, चमत्कार, दृष्टांत अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. देव म्हणजे माझ्या साठी एक प्रचंड शक्ती चा source आहे आणि त्याच्या वरची माझी श्रद्धा ही मुख्यत्वाने मला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहे आणि त्या शक्ती चा आधार घेऊन जे काही आयुष्यं समोर ठेवेल त्याला हसत सामोरे जायची प्रेरणा मिळते असं मी मानते. त्याच्या नामस्मरणातून शांती मिळवणे आणि त्याच्या भक्तीमधून स्वतःचा मार्ग शोधणे हा माझा प्रयत्न राहिला आहे.  माझ्या आई चं आणि काही नातेवाईकांचं वेगळं आहे. ते बऱ्याचदा अनुभूती, साक्षात्कार, स्वप्नात देवाने किंवा गुरूंनी दर्शन देणे किंवा काही प्रचिती येणे ह्या बाबतीत बोलत असतात. मी आई ला नेहमीच तोडत आले. "आई तुझं काहीही असतं हा, असं काही अनुभूती किंवा दृष्टांत वगैरे नसतं. आपल्या मानण्यावर सगळं असतं" "अगं मना श्रद्धा तेथे प्रचिती.. तुला नाही कळणार.. " आमचं हे असं discussion बऱ्याचदा झालंय आणि नेहमीच मी असे विषय उडवून लावायचे.  आईमुळे आणि बाबांमुळे  श्री शिर्डी साईबाबा, श्री गजानन महाराज ह्यांचं घरात खूप केलं जातं. पूजा, ग्रंथपाठ वगैरे बाकी देवांबरोबर ...

The "Good" News

Image
Being a mother is the most beautiful thing I have ever experienced in my life! I am blessed to have received the “good news” twice :) When I came to know about it during my first pregnancy, needless to say I was on cloud nine. My searches were full of pregnancy queries right from which apps to download, the ultrasound, doctor visit questions, cravings, maternity clothes to preparing for the new arrival and what not! This world of pregnancy painted a nice picture around me that was full of happiness, feeling of being blessed and feeling of positivity. I was busy getting pampered, enjoying every bit of my pregnancy trying to prepare for the little one, happily being receptive to tons of advice coming from everyone I knew. They told me about how to prepare for delivery, about restless nights, about endless changing diapers, about everything from what my diet should be to how to handle the new one and how our life is going to be changed forever.  I delivered my healthy bab...

आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ...

Image
आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ... आयुष्यभर कष्ट करून सांभाळलीस संसाराची गाडी जपल्यास आम्हा सगळ्यांच्याच आवडी निवडी जरा निवांत बस, एन्जॉय कर आजू बाजूचं जग .. सोड ऑर्डर आम्हाला आणून द्यायला हातात कॉफी चा मग त्या  आयत्या कॉफी चा खुशीने फुरका घे .. आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ... यायचीस ऑफिसातून दिवसभर थकून भागून बॅग पण न ठेवता घ्यायचीस श्वास आम्हाला दोन घास भरवून सोडून स्वतःची दुखणी द्यायचीस आमचेच कोड पुरवून जरा रिलॅक्स कर हक्कानं सांग, द्या पाय चेपून कधी तरी स्पा मधल्या मसाज चा आनंद घे .. आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ... दिलास सर्वस्वी आम्हाला वेळ विसरून स्वतःची हौस निघून यायचीस आमच्या साठी जेव्हा मैत्रिणी करायच्या मौज जरा  बघ तो राहिलेला सिनेमा, ऐक ती मनपसंद गाणी पहा नाटक ते विनोदी, हंस खळखळून येऊ पर्यंत डोळ्यात पाणी जरा जोपास ते छंद, त्या हौशींची मजा घे .. आई, आता तरी स्वतःला जरा वेळ दे ... नेहमीच सजवायचीस मला, सगळे लाड पुरवलेस बनवून मला राणी शंभरदा तुला छळायचे मी अगदी येऊ पर्यंत मनासारखी वेणी सगळी नाटक केलीस सहन, स्वतःचा  विसरून च...

Remember ! All that matters is - Your Mental Health ..

Image
Life has changed me drastically year over the years as phases of my life changed from the childhood to the adulthood and now moving towards the remaining. It has evolved in terms of my existence with the rest of the Society from dependence on the family, relatives and friends and a drive to pursue this happiness among those surrounding me to finding that inner peace and giving utmost priority to self mental health. “A happy you creates happiness around you” - we have been hearing this through various sources of monks, psychology, thoughts for the day quotes and what not.  What does that mean for me really? That means -   caring less about my impression on the others,  feeling less scared of society judging me,  not trying harder to please everyone,  not trying harder to fit others in my equation and forcing my expectations on them,  not trying harder to make or break connections, not trying harder t...

माझी Tattoo जर्नी (My Tattoo Journey)

Image
"मैं सोच रही हूं tattoo करवा लू " Saturday मॉर्निंग चहा चा घोट घेत मी अतीशय उत्साहाने नवऱ्याला सांगितलं. चेहऱ्यावर "आज कुछ तूफानी करते है" चा जोष, डोळ्यांत चमक आणि आवाजात दृढ निश्चयाचे वजन. अपेक्षेप्रमाणे अत्तिशय शांत आणि neutral अशी त्याची प्रतिक्रिया आली. "hmm .. ये कैसे अचानक सोचा?" "अचानक नही है .. बोहोत पेहले से था दिमाग मैं. अभी time है तो सोचा try करू" थोडा pause घेत तो - "Ok.. थोडा research करते है पेहले .. फिर देख लेना" "actually कपल टॅटू करा लेते है .. what say " "देखते है" जेव्हा त्याला एकदम मला तोडायचं नसतं तेव्हा अत्तिशय carefully असा response येतो.. neither positive nor negative .. पण माझ्या साठी नुसतं ते पण पुरेसं होतं "हां चलेगा" मी उत्साहाने म्हणलं आणि लगेच google search ला लागले.. बहुतांश सरळमार्गी लोकांसाठी किंवा आपल्या आधीच्या पीढी साठी tattoo हा शब्द "नसती थेरं" मध्ये ट्रान्सलेट व्हायचा. बऱ्याच वर्षांपूर्वी मी जेव्हा शेज़ारच्या एका मुलीचा tattoo बघ...